औरंगाबाद – काळी-पिवळी जीप आणि उसाचा ट्र्ॅक्टर यांचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री पैठण तालुक्यातील पैठण-शहागड रोडवर घडली. या अपघातात जीप चालकाचा मृत्यू झाला असून जीपचा अक्षरश: चुराडा झाला आहे. नियंत्रण सुटल्याने जीप ट्रॅक्टरला पाठीमागून धडकून हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण-शहागड रस्स्त्यावरील आयटीआयसमोर प्रवासी वाहतूक करणारी काळी-पिवळी जीप भरधाव वेगाने जात होती. यावेळी जीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जीप समोर असलेल्या ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात काळी-पिवळी चालक नारायण यांच्या डोक्याचे दोन भाग झाले. तर जीपमध्ये रक्ताचा सडा पडला होता.
काळी-पिवळी चालक पैठणहून तुळजापूरकडे जात होता. दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने काळी-पिवळी चालकाचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे काळी-पिवळी चालकाचा धड व शीर वेगळे होऊन डोक्याचे दोन भाग झाले होते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी काळी-पिवळी चालकाला शासकीय घाटी रुग्णालयात हलवले. मात्र त्याचा जागीच मृत्यू झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या सर्वत्र उसतोडणी सुरु आहे. ट्रॅक्टरचा स्पीड कमी असल्यामुळे अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.