बीड – काही दिवसांपूर्वी नृत्यांगना गौतमी पाटीलने एका खासगी वृत्तवाहिनिला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कसा पती अपेक्षित आहे याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर गौतमीच्या लग्नाबाबतच्या त्या वक्तव्याची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली.
“आता मी २५ वर्षांची आहे. लग्न करून घरसंसर थाटावा अशी माझी ईच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून ईच्छा आहे म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.” असे गौतमीने म्हंटले होते.
दरम्यान, गौतमीच्या या विधानानंतर बीड जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने गौतमीला पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पत्रात लिहिले आहे की, “गौतमी पाटीलचे हाल बेहाल, तुमचे चाहते लाखो पण.. लग्नाला तयार कोणीच नाही. आमच्या महाराष्ट्रात मुलगी लग्नाला आली कि मुलाच्या घरचे मुलींच्या घराचे उंबरठे झिजवतात. तरी मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुलीला लग्न कर म्हणायची वेळ येत नाही. गौतमी पाटील तुमचे लाखो चाहते पण.. लग्नाला कोणीच तयार नाही.
तुमचे ठुमके वर लाखो फिदा पण लग्नाला कुणीच तयार नाही जरा आत्म परीक्षण करा. या महाराष्ट्रात चातक मटक भाजी एकवेळ गॉड लागते पण पोट व मन भरायला चटणी भाकरी भाजी ठेसाच लागतो. हा कृषिप्रधान देश आहे तुमच्या डान्सचे ठुमके कमी करा गौतमी पाटील तुम्ही आत्म परीक्षण करा. खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अयोध्येला निघालेत, महाराष्ट्रात विजेचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने पिके गेली मुकी जनावरे गेली. तरी काही तरुण वर्ग तुमच्याच नादात असला आणि लाखो चाहते असले तरी एकही लग्नाला तयार नाही. किसान पुत्र श्रीकांत गडळे सांगतो … इतर शेतकरी पुत्र उपाशी राहतील कापसाला पाणी बकेटने मारतील पण लग्नाला कोणीच तयार होणार नाही.”
गौतमी पाटील हे नाव गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरले आहे. सुरूवातील अश्लील नृत्यामुळे ती चर्चेत आली. त्यानंतर तिचा एक वस्त्र बदलतानाचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर आता ती लग्नाच्या वक्तव्याने चर्चेत आली आहे. तसेच सोशल मीडियावर तिच्याबाबत सातत्याने वेगवेगळ्या पोस्ट दिसत असतात.