वीसगाव खोरे (वार्ताहर) – उत्रौली (ता.भोर) येथील जयश्री विठ्ठलराव यादव आणि विठ्ठलराव यादवराव यादव या उभयतांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने नातवांनी पुन्हा एकदा आजी आजोबांच्या लग्नाचा बेत आखला आणि यशस्वीरित्या धुमधडाक्यात लग्न सोहळा शेकडो आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवाराच्या साक्षीने पुन्हा एकदा पार पाडला.
यादव दांपत्याचा पारंपरिक पद्धतीने लग्नाचे विधी करत लग्न लावून पन्नासावा लग्नाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला.उत्रौलीमधील सरस्वती मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. लग्नाचा वाढदिवस साजरा करताना प्रामुख्याने यात बुधवारी (दि.१५) रात्री साखरपुडा,हळद, मेहंदी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी( दि.१६) सकाळी होम हवन, अभिषेक, रुखवत, मुंडावळ्या बांधून व अंतरपाट धरुन मित्र मैत्रिणीच्या साक्षीने मंगलाष्टका म्हणत अक्षदा टाकून लग्न लावले. मामांच्या हस्ते कन्यादान करण्यात आले. नवरा नवरींसह उपस्थितांनीही उखाणे घेतले.८१ वर्षीय आजीबाईंना कलवरीचा मान मिळविला.
५० वाढदिवस केक कापून आजी आजोबांनी एकमेकांना केक भरवत अनोखा वाढदिवस साजरा केला.बजाज चेतक गाडीवर फोटो काढण्याचा मोह नववधु वरास आवरता आला नाही. उभयतांना भेट वस्तू देण्यात आल्या. त्यानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. एवढेच नव्हेतर वधूवरांच्या राहत्या घरी स्वागताचा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रगती नवघणे, प्रबल नवघणे, वरद यादव, वेदांत यादव,विस्मया थोरात, वर्धन थोरात, ध्रुव यादव, शर्व यादव,जीजा शिवतरे आणि महिलांनी उत्तम नियोजन केले होते.
उत्रौली (ता.भोर) येथील जयश्री विठ्ठलराव यादव आणि विठ्ठलराव यादवराव यादव या उभयतांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने नातवांनी पुन्हा एकदा आजी आजोबांच्या लग्नाचा बेत आखला आणि यशस्वीरित्या धुमधडाक्यात लग्न सोहळा शेकडो आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवाराच्या साक्षीने पुन्हा एकदा पार पाडला.