प्रभात ऑनलाइन – दारूची नशा अशी आहे की भले भले ‘जानेमाने’ लोक रस्त्यावर येऊन धिंगाणा घालतात. मग सामान्य माणसाची गोष्टच वेगळी असते. असे दिसून येते की नशेत ती व्यक्ती इतकी बुडते की कधी कुणी भररस्त्यात नाचू लागतो तर काही लोक फाडफाड इंग्रजी बोलू लागतात.
आणि अशावेळी त्या व्यक्तीला कोणताही प्रश्न विचारला असता तो त्याचे उत्तर मात्र हटकून इंग्रजीतच देत असतो. पण नशेत असताना लोक असे का वागतात, याची तुम्हाला माहिती आहे का? वास्तविक, या क्रियेमागे एक छुपे वैज्ञानिक कारण आहे, जे या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते.
* नशेत आत्मविश्वास वाढतो
जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, अल्कोहोलच्या काही पेगनंतर व्यक्तीचा आंतरिक आत्मविश्वास वाढू लागतो आणि ते इंग्रजी भाषेत बोलू लागतात. एरवी इंग्रजी बोलताना बिचकणारे लोक काही पेग पोटात जाताच ‘सायबा’ची भाषा बिंदास्त बोलू लागतात.
* व्यक्तिमत्त्वात बदल होतो
केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की अल्कोहोलचे सेवन लोकांच्या स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम करते. यावेळी काही लोकांचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलते आणि त्यांचा आत्मविश्वास वेगाने वाढू लागतो. जेव्हा हे घडते तेव्हा ते जागरूक असतांना ज्या गोष्टी करण्यास कचरतात, त्या गोष्टींवर त्यांचे लक्ष केंद्रित करणे सुरू होते.
- दुसरी भाषा बोलण्याव्यतिरिक्त, काही लोक सामान्य स्थितीत जे करू शकत नाहीत अशा गोष्टी देखील करतात. जसे नाचणे किंवा गाणे म्हणणे. ते मद्यपान करतात आणि त्यांच्यात आलेल्या आत्मविश्वासाने मौज मजा करतात. वास्तविक, भरपूर मद्यपान करणे आरोग्यासाठी चांगले नाही. दारुसारख्या पेयांच्या मदतीशिवाय तुम्ही स्वत: चा आत्मविश्वास वाढवू शकता.