टीम ’83’ चा नवीन लुक

निर्माता-दिग्दर्शक कबीर खान यांचा 1983 मधील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघावर आधारित ’83’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणवीर सिंग या सिनेमामध्ये भारतीय संघांचे माजी कर्णधार ‘कपिल देव’ यांची भूमिका साकारत आहे. नुकतंच रणवीरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ’83’ सिनेमाच्या संपूर्ण टीमचा फोटो टाकला आहे. त्यामुळे या सर्वच कलाकारांचा लूक सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. फोटो मध्ये रणवीर सिंग, आदिनाथ कोठारे, हार्डी संधू, साहिल खट्टर, साकिब सलीम, चिराग पाटील आणि सिनेमातील इतर सर्वच कलाकार दिसून येत आहे.

’83’ सिनेमाचे शूटिंग सुरु होण्याआधीच निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 10 एप्रिल 2020 मध्ये ’83’ हा सिनेमा रुपेरी पडद्यावर येणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.