#ICCWorldCup2019 : वेस्ट इंडिजचे न्यूझीलंडसमोर 422 धावांचे आव्हान

ब्रिस्टल – वेस्टइंडिजचा फलंदाज शाइ होप यांच्या शतकी तर एविन लुईस आणि आंद्रे रसेल याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने सराव सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी 422 धावचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 49.2 षटकांत सर्वबाद 421 धावा केल्या.

वेस्टइंडिज संघाकडून फलंदाजीत शाइ होपने 86 चेंडूत सर्वाधिक 101 धावा केल्या. तर एविन लुईसने 50, आंद्रे रसेलने 54, जेसन होल्डरने 47 धावांची खेळी केली. वेस्टइंडिज संघाला 26 धावा अतिरिक्त मिळाल्या, यामध्ये 18 वाईड आणि 4 नो बाॅलचा समावेश आहे.

न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजीत मैट हेनरी या गोलंदाजाने 9 षटकांत सर्वाधिक 107 धावा देत 2 गडी बाद केले. त्याच्यापाठोपाठ लॉकी फर्ग्यूसनने 10 षटकांत 86 धावा तर मिचेल सैटनरने 9 षटकांत 71 धावा देत 1 गडी बाद केला. ट्रेटं बोल्टने 9.2 षटकांत 50 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)