पुणे, दि. 5 -राज्य शासनाने करोना संसगामुळे पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा दिल्यानंतर आता 15 हजार पदांची पोलीस भरतीची नव्याने जाहिरात दि. 9 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अखेर सुटकेला नि:श्वास सोडला आहे.
पोलीस शिपाई भरतीची जाहिरातबाबतची सविस्तर माहिती 9 नोव्हेंबरला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीसच्या संकेतस्थळावर भरतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापूर्वी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांत या जाहिरातीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे आता नव्याने पोलीस भरतीची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल, याविषयी उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था होती.