दौंड- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ दौंड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दौंड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. व्यापाऱ्यांनी शहरातील सर्व दुकाने बंद ठेवली होती.
मोर्चात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दौंड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. यावेळी तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली.