मुंबई – काल झालेल्या दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह यावेळी ठाकरेंच्या निशाण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते.यानंतर आता राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे,उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार हकदार होऊ शकता परंतु खरी विचारधारा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. असा टोला खासदार नवनीत राणा यांनी लगावला आहे.
खासदार नवनीत राणा यांनी ट्विटरद्वारे आपले म्हणणे मांडत उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात,”उद्धव ठाकरे यांनी भाषणातून पूर्णपणे आपला राग व्यक्त केला.ते वारंवार सांगतात,बाप चोरला बाप चोरला,परंतु आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकता परंतु विचारधारा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. कारण एका पक्षातून ४० आमदार जर एका बाजूला जातात याचा विचार व्हायला हवा. तसेच उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे ते आज पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं” अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.
@TV9Marathi @abpmajhatv @JaiMaharashtraN @lokmat pic.twitter.com/tfyt99Gwsq
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) October 5, 2022
उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय भाष्य करणार यावर विरोधकांनी भाषणापूर्वीच कयास लावले होते.परंतु यावेळी ठाकरेंनी केवळ शिंदे गटावर निशाणा न साधता देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मोहन भागवत यांच्यावर देखील टीका केल्याचे दिसून आले. यावेळीही उद्धव ठाकरेंनी अमित शहांना पाकव्याप्त जमीन घेऊन दाखवा असे आव्हान दिले.