राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धा : भाग्यबाती कचारी, अकुंशिता बोरो उपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : इंडिया ओपन सुवर्णपदक विजेती भाग्यबती कचारी आणि माजी जागतिक युवा चॅम्पियन अंकुशिता बोरो हिने गुरूवारी महिला राष्ट्रीय बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.रेल्वेचे प्रतिनिधित्व करणा-या आसामच्या कचारीने ८१ किलो वजनी गटात जिज्ञासा राजपूत हिचा सहजपणे ५-० असा पराभव केला.

दुसरीकडे अंकुशिता बोरोने हिमाचल प्रदेशच्या एरिका शेखर हिचा ५-० ने पराभव करत आगेकूच केली.हरियाणाची नुपूर हिने ७५ किलो वजनीगटात हिमाचल प्रदेशच्या संध्याचा ५-० असा पराभव करत एकतर्फी विजय नोदंवला.

तसेच या स्पर्धेत अखिल भारतीय पोलिसची लालफाकमावी राल्टे, उत्तर प्रदेशची आराधना पटेल, केरळची अंशुमोल बेन्नी, दिल्लीची अंजली आणि शलाखा सिंह यांनी आपपल्या वजनी गटात विजय नोंदवत पुढील फेरीत आगेकूच केली. स्पर्धेतील बाद फेरीतील सामने ६ डिसेंबरला तर अंतिम सामने ८ डिसेंबरला पार पडतील.

Leave A Reply

Your email address will not be published.