नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भुतानला जाणार

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट महिन्यात भूतानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींचा हा दोन दिवसीय दौरा असून त्यांचा हा भूतानचा दुसरा अधिकृत दौरा असणार आहे. यापुर्वी 2014 साली त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आपला पहिला विदेश दौरा हा भुतान या देशाचा केला होता.

पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा भूतानचे भारतासोबत असलेल्या संबंधांचे महत्त्व सांगण्या बरोबरच भारताच्या नेबरहूड पॉलिसी बद्दल सांगण्या बद्दलचा असणार आहे. दरम्यान गेल्या महिन्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकरनं भूतानचा दोन दिवसीय अधिकृत दौरा केला होता. परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जयशंकर यांचा हा पहिला परराष्ट्र दौरा होता. या दौऱ्यादरम्यान परराष्ट्र मंत्र्यांनी भूतानचे पंतप्रधान लोताय त्सेरिंग यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या संधीवर चर्चा केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)