Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या हस्ते आज 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मोदी नाशिकमधील ओझर विमानतळावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नाशिककरांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे पाहायला मिळाली.
रोडशोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान मोदी हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. येथे विशेष किर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या किर्तनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. काळाराम मंदिरात मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. विशेष म्हणजे वारकऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी टाळ वाजवण्यात दंग झाले होते.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकरांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी देशातील युवकांना तीन मंत्र दिले आहेत. व स्थानिक वस्तूंचा जास्तीत वापर करा. देशातील प्रत्येक तरुण त्यांच्या निष्ठेने सशक्त आणि सक्षम भारतासाठी प्रयत्न करेल, हा मला विश्वास आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका आणि आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा, असा सल्ला मोदींनी तरूणांना दिला आहे.