नांदेड – नांदेड शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका महिला डाॅक्टरने शहरातील पंजाब लॉजमध्ये कटरच्या सहाय्याने गळा, हात कापून आत्महत्या केली आहे. हा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री ही घटना घडली आहे.
विद्या अमोल सुंकवाड असे आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरचे नाव असून भोकरमध्ये पती व त्यांचा दवाखाना आहे. डॉ विद्या यांनी हे टोकाचे पाऊन का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. या आत्महत्येची वजिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
डॉ विद्या ह्या बुधवारी भोकर येथून रेल्वेने नांदेड शहरात आल्या होत्या. त्यांनी रेल्वेस्थानकाजवळच असलेल्या पंजाब लॉजवर मुक्काम केला व येथेच आत्महत्या केली. विद्या यांच्या बॅगमध्ये मोठी दोरी, गोळ्या, औषधं सापडली आहेत. विशेष म्हणजे डॉ विद्या यांचे माहेर आणि सासर नांदेडच आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.