Merry Christmas – अभिनेत्री कतरिना कैफ आणि साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अशात येत्या ख्रिसमसमध्ये निर्मात्यांनी त्यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला आहे. श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या मागील ‘बदलापूर’ आणि ‘अंधाधुन’ या चित्रपटांच्या शैलीची झलक पाहायला मिळते. अशात या चित्रपटाची उत्सुकता खूप वाढली आहे.
अशात ‘मेरी ख्रिसमस’चे दुसरे गाणे ‘नजर तेरी तुफान’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे पारंपरिक आणि समकालीन संगीताचे सुंदर मिश्रण आहे. प्रीतमचा सिग्नेचर टच या रचनेत दिसतो, जो संगीतप्रेमींसाठी एक अद्भुत अनुभव आहे. पापोनने हे गाणे खूप सुंदर गायले आहे.
गीतकार वरुण ग्रोवर यांनी लिहिलेल्या ‘नजर तेरी तुफान’ या गाण्याचे बोल आणि संगीत संयोजन मिळून एक उत्तम गाणे तयार केले आहे. ‘मेरी ख्रिसमस’ बद्दल बोलायचे तर श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे. संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिनू आनंद, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत.