नागपूर – करोना महामारीत संपूर्ण जगाला आर्थिक संकटाला समोर जावे लागले. महामारीच्या काळात अनेक लोकांनी आपला रोजगार गमावला. आता करोना महामारीचा काळ संपला असला तरी अजूनही आर्थिक संकटाना अनेकांना समोरे जावं लागत आहे. असातच नागपूरचे वृद्ध दाम्पत्य अशाच आर्थिक संकटाना सामोरे जात आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये डोक्यावर छप्पर राहावं यासाठी हे आजी-आजोबा रस्त्यावर एक छोटासा स्टॉल लावून फक्त 10 रुपयांत तर्री पोहे विकत आहेत. नागपुरातील पंडित नेहरू कॉन्वेंटजवळ एक छोटंसं स्टॉल आहे. गेल्या पाच वर्षांपासून वृद्ध दाम्पत्य हा स्टॉल चालवत आहेत. एका युट्यूबने त्याचा अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतील आजी – आजोबा त्यांना करोना महामारीत कुठल्या आर्थिक संकटाला समोर जावं लागलं याबाबत सांगत आहे.
सध्या सोशल मीडियामुळे अनेकाची नशिबं उजाडली आहे. यापूर्वी दिल्लीतील बाबा का ढाबा चा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांचा मदतीला अनेक लोक पुढे आले होते. अशीच मदत नागपुरातील या आजी आजोबांना मिळावी अशीच इच्छा सोशलवरील युजर्स द्वारे व्यक्त केली जात आहे.