नेवासा – शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री.दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुकींदपूर येथील १९ वर्ष वयोगटातील संघाने सुवर्ण पदक पटकावले.
वीर सावरकर (रंगोली) मैदान, यवतमाळ येथे शालेय १९ वर्ष मुले व मुली यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील विद्यालयाच्या संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत प्रथम फेरीत लातूर, द्वितीय फेरीत अमरावती आणि अंतिम सामन्यात छत्रपती संभाजी नगर विभागाला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.
यापूर्वी २०१९ ला नाशिक येथे झालेल्या शालेय १९ वर्ष कबड्डी स्पर्धेत देखील विद्यालयाच्या संघाने सुवर्णपदक पटकावले होते. अशी कामगिरी करणारे हे जिल्ह्यातील एकमेव विद्यालय आहे. संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांनी खेळाडूंना ग्रामीण भागात देखील उच्च प्रतीच्या सुविधा निर्माण करून दिल्यामुळे संस्थेचे अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत. राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांचे बहुमोल मार्गदर्शन विद्यालयाच्या खेळाडूंना लाभत आहे. या संघातील खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यशस्वी संघातील खेळाडू पुढील प्रमाणे : आशिष वाघ, वेदांत उंदरे, शुभम बिटके, विशाल ब्रम्हणे, गौरव गटकळ, योगेश खराडे, किरण वाघ, शिवतेज साळुंके, सौरभ शिरसाठ, प्रणव कोरेकर, प्रशांत उपळकर, प्रविण खेडकर. विजयी संघाला राष्ट्रीय खेळाडू प्राचार्य सोपानराव काळे, गणेश शिंदे, मुकेश जाधव, अशोक पानकडे यांचे प्रशिक्षण लाभत आहे. क्रीडा प्रशिक्षक संभाजी निकाळजे, अभिजीत दळवी, महादेव काकडे, छबुराव काळे, साहेबराव दाणे, संदीप वाघमारे, नितीन चिरमाडे, पदम्राज गायके, माधुरी भोसले यांचे सहकार्य लाभत आहे.