हडपसर – येथील उपनगर व पंचक्रोशीत साधारण १० लाख लोक राहत असून राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागामध्ये त्यांचा प्रवास असतो. हीच बाब पुढे ठेऊन नव्याने विकसित झालेल्या काळे – बोराटे नगर रेल्वे स्टेशन येथे सह्याद्री एक्सप्रेस, कोयना एक्स्प्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांसाठी ५ मिनिटांचा थांबा असावा, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केली आहे.
यावेळी भाजपा हडपसर विधानसभा माजी अध्यक्ष सुभाष जंगले ,भाजपा महिला आघाडी अध्यक्षा स्वाती प्रमोद कुरणे, माजी नगरसेविका विजया वाडकर,योगेश सूर्यवंशी, इम्तियाज मोमिन, पोपटराव वाडकर, प्रमोद सातव आदीसह भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते काळे – बोराटे नगर रेल्वे स्टेशनच्या नामफलकाचे उद्घाटन व्हावे, इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. तेव्हा त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच काळे – बोराटे नगर रेल्वे स्टेशनच्या नामफलकाचे उद्घाटनही मंत्री दानवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार योगेश टिळेकर यांनी दिली