चंदीगड – ईदच्या निमित्ताने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुस्लिमबहुल क्षेत्र असलेल्या मलेरकोटलाला पंजाबचा 23 वा जिल्हा म्हणून घोषित केले आहे.
लोकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केली गेली. मलेरकोटला हा राज्यातील 23 वा जिल्हा असेल, असंही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले. ईद-उल-फितरनिमित्त जनतेचे अभिनंदन करण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली.
तसेच वैद्यकीय महाविद्यालय, महिला महाविद्यालय, नवीन बसस्थानक आणि मलेरकोटला यांना 500 कोटी रुपये दिल्याचीही माहिती दिलीय. त्यांनी महिला पोलिस स्टेशन स्थापन करण्याचीही घोषणा केली.
Happy to share that on the auspicious occasion of Eid-ul-Fitr, my Govt has announced Malerkotla as the newest district in the state. The 23rd district holds huge historical significance. Have ordered to immediately locate a suitable site for the district administrative complex. pic.twitter.com/9j6pNRgXWC
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) May 14, 2021
शहर मलेरकोटला हे आजवर संगरूर जिल्ह्याचा एक भाग होता आणि ते संगरूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 35 किमी अंतरावर होते. नवीन जिल्ह्याची घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मला ठाऊक आहे की, ही दीर्घकाळ मागणी प्रलंबित आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी पंजाबमध्ये 13 जिल्हे होते. मलेरकोटला, अमरगड आणि अहमदगड शहरही मलेरकोटला हद्दीत येतील, असंही त्यांनी सांगितलं.
एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, ईद-उल-फितरच्या पूर्वसंध्येला माझ्या सरकारने मलेरकोटला हा राज्यातील नवीन जिल्हा असल्याचे जाहीर केले, याचा आनंद वाटतो. 23 व्या जिल्ह्याचे प्रचंड ऐतिहासिक महत्त्व आहे. जिल्हा प्रशासनाला प्रशासकीय संकुलासाठी योग्य जागा त्वरित शोधण्याचे आदेश दिलेत. मलेरकोटलाला जिल्हा दर्जा देणे ही कॉंग्रेसने निवडणुकीपूर्वी केलेली आश्वासने होती.