मृत्यूचे थैमान कायमच! एका दिवसात पुन्हा ४ हजार रुग्णांनी गमावले प्राण

नवी दिल्ली : देशातील करोनाची दुसऱ्या लाटेची परिस्थिती अजूनही कायम आहे. रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अद्यापही देशात साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण दररोज आढळून येत आहेत. तर मृत्यू संख्येचा आलेख मात्र चढतानाच दिसत आहे. देशातील करोनामुळे होत असलेल्या मृत्यूचे थैमान काही केल्या कमी होताना दिसत नाही.

गेल्या २४ तासांतील मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तितकीच एक बाब देशासाठी दिलासा देणारी ठरली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतात काल दिवसभरात तीन लाख २६ हजार ९८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ५३ हजार २९९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. मृत्यू संख्येच्या सरासरीत कोणतीही घट होताना दिसत नाही.

गेल्या काही दिवसांपासून दररोज चार हजारांच्या आसपास मृत्यूंची नोंद होत आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ६६ हजार २०७ वर पोहोचली आहे. तर सध्या देशात ३६ लाख ७३ हजार ८०२ रुग्ण उपचार घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.