#MushtaqAliT20 : सुपर लीगमध्ये दिल्लीचा महाराष्ट्रावर विजय

सूरत : नितीश राणाच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर गुरूवारी दिल्लीच्या संघाने सईद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सुपर लीगमध्ये महाराष्ट्रावर ७७ धावांनी विजय नोंदविला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ५ बाद १६७ धावांपर्यत मजल मारली.दिल्लीकडून फलंदाजीत ध्रुवने नाबाद ४८, हिम्मतसिंगने ३२, शिखर धवनने २४ तर नितीश राणाने २१ धावा केल्या. गोलंदाजीत महाराष्ट्राकडून शमशुझमा काझीने सर्वाधिक २ तर सत्यजित बच्छाव, समद फल्ला आणि दिग्विजय देशमुखने प्रत्येकी १ गडी बाद केला.

विजयासाठी १६८ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राच्या संघाला १८ षटकात सर्वबाद ९० धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. महाराष्ट्राकडून फलंदाजीत रूतुराज गायकवाडने सर्वाधिक ४२ धावा केल्या. दिल्लीकडून गोलंदाजीत नितीश राणाने १७ धावा देत सर्वाधिक ४ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

Leave A Reply

Your email address will not be published.