जागतिक नेमबाजी स्पर्धा : दिव्यांश पन्वरला सुवर्णपदक

नवी दिल्ली : भारतीय युवा नेमबाज मनू भाकर,इलावेनिल वलारिवान या महिला खेळाडूंनी गुरूवारी आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनल नेमबाजी स्पर्धेत आपपल्या प्रकारात सुवर्णवेध घेतला. त्यानंतर त्याचदिवशी पुरूषांच्या १० मी. एअर रायफलमध्येही १७ वर्षीय दिव्यांश पन्वरने २५०.१ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.

स्पर्धेत हंगेरीच्या इस्तवान पेनीला (२५०.० गुण) रौप्य तर स्लोव्हाकियाच्या पॅट्रिक जॅनीला (२२८.४गुण) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

वर्ल्ड कप फायनलमधील दिव्यांशचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. यापूर्वी, वर्ल्ड कप फायनलमध्ये पुरूषांच्या १० मी. एअर रायफलमध्ये भारताच्या गगन नारंगने सुवर्णपदक पटकावले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.