‘एमआय’चे हटके ‘फिचर’ जे ‘आयफोन’मध्येही नाही!

मुंबई – तसं पाहायला गेल्यास स्मार्टफोन्सच्या नावाने गळे काढण्यासाठी अनेक कारणं असली तरी स्मार्टफोन्समुळे आपलं जगणं अधिक सुसह्य झालं आहे हे सत्य देखील मुळीच नाकारता येणार नाही. आजकालच्या स्मार्टफोन्समध्ये केवळ मनोरंजनच नव्हे तर अनेक जीवन उपयोगी फिचर्सची देखील रेलचेल असल्यानं अनेक वेळा हा स्मार्टफोनचं आपला तारणहर्ता ठरताना दिसतो.

अशा या अनेकांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या स्मार्टफोनमध्ये आजच्या घडीला असंख्य फीचर्स असली तरी देखील या फिचर्समध्ये दिवसागणिक वाढच होताना दिसतीये. एमआय या जगप्रसिद्ध चायनीज स्मार्टफोन कंपनीने आपल्या स्मार्टफोनमध्ये अशाच प्रकारचं एक ‘लाईफ-सेव्हीयर’ फिचर नुकतंच लॉंच केलं आहे.

एमआयच्या या नवीन फिचरमुळे आता तुम्हाला तुमचा स्मार्टफोनचं भूकंपाची पूर्वसूचना देणार आहे. एमआयने उपलब्ध करून दिलेल्या या खास फिचरद्वारे तुम्हाला भूकंपाचा केंद्र बिंदू, त्याची तीव्रता व रेडियस अशा महत्वपूर्ण बाबींची माहिती थेट तुमच्या स्मार्टफोनमध्ये मिळणार आहे. एमआयचं हे खास फिचर ग्राहकांना एमआययुआय ११ या सॉफ्टवेअर अपडेटद्वारे उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.