Mumbai Open WTA 125K Tennis Tournament – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १ लाख २५ हजार डॉलर टेनिस स्पर्धेत दुहेरीत स्लोवाकियाच्या दलीला जाकुपोवीच व अमेरिकेच्या सबिना सांतामारिया या जोडीने विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत दुहेरीत अंतिम फेरीत स्लोवाकियाच्या दलीला जाकुपोवीच व अमेरिकेच्या सबिना सांतामारिया या जोडीने नेदरलँडच्या एरियन हार्टोनो व भारताच्या प्रार्थना ठोंबरे यांचा ६-४, ६-३ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना १ तास २५ मिनिटे चालला. जाकुपोवीच २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत एकेरीत उपविजेतेपद पटकावले होते. अंतिम लढतीत आर्यना सबलेंका विरुध्द तिला पराभवाचा सामना करावा लागला होता.
Mumbai Open WTA 125K Tennis Tournament :लात्वियाच्या सेमेनिस्तेजाने पटकावलं विजेतेपद..
स्पर्धेतील विजेत्या दलीला जाकुपोवीच व सबिना सांतामारिया यांना करंडक, ५००० डॉलर व १२५ डब्लूटीए गुण, तर उपविजेत्या एरियन हार्टोनो व प्रार्थना ठोंबरे यांना करंडक, २५०० डॉलर, ८१ डब्लूटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली.