Mumbai Fire: मुंबईच्या भायखळा परिसरातील मदनपुरा येथे सैफी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत काहीजण अडकल्याची माहिती आहे. आतापर्यंत इमारतीतून पाच जणांची सुटका करण्यात आली. यात कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, ही आग इतकी भीषण आहे की परिसरात आगीचे धूर पसरले आहे. ही आग जेव्हा लागली तेव्हा इमारतील लोकांची एकच धांदल उडाली होती. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.