kriti sanon – क्रिती सॅननने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिची जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. 2014 साली इंडस्ट्रीत एंट्री केलेली क्रिती आज अशा टप्प्यावर आहे की तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनयासोबतच क्रिती आपल्या स्पष्टवक्ते-पणासाठीही प्रसिद्ध आहे. प्रत्येक सामाजिक प्रश्नावर ती आपले मत मांडते. नुकतेच तिने बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीबाबत वक्तव्य केले आहे.
क्रिती सॅननने एका ताज्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘जर एखाद्या निर्मात्याने इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना लॉन्च केले तर त्याने इंडस्ट्रीशी संबंधित नसलेल्यांनाही पाठिंबा दिला पाहिजे. त्या निर्मात्याने बाहेरच्या लोकांच्या टॅलेंटला साथ दिली पाहिजे. त्याने बाहेरच्या लोकांना समान पाठिंबा दिला पाहिजे’
व्होग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत क्रितीने सांगितले की, आजकाल लोक सुपरस्टार आणि मोठ्या नावांऐवजी टॅलेंट आणि स्क्रिप्टकडे आकर्षित होत आहेत. जर तुम्ही स्टार किडचे प्रमोशन करत असाल तर बाहेरच्या लोकांनाही समान अधिकार द्या, असे क्रिती म्हणाली.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, क्रिती सॅनन सध्या तिच्या गणपत या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. इंडस्ट्रीत वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या क्रितीला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. ‘मिमी’ या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय क्रितीचे आणखी चित्रपट रांगेत आहेत. शाहिद कपूरसोबत एका रोमँटिक चित्रपटाच्या तयारीतही ती व्यस्त आहे. त्याचवेळी करीना कपूर तब्बू आणि दिलजीत दोसांझसोबतही पडद्यावर दिसणार आहे. या अभिनेत्रीकडे तीन पट्टी नावाचा आणखी एक प्रोजेक्ट आहे.