पौड, (वार्ताहर) –घोटावडे (ता. मुळशी) येथील जय सुचंद्रिका मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या जगद् गुरू श्री संत तुकाराम महाराज अभंग व भजन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडल्या. या तालुकास्तरीय स्पर्धेत पुरुष व महिला आशा एकूण 35 संघानी सहभाग घेतला.
तालुकास्तरावर क्रमांक पटकाविणार्या संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल स्थानी येणार्या भजनी मंडळाला दीड लाखांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. भजन व अभंगांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विविध सामाजिक विषयांबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून पाणी वाचवा व स्वच्छता या विषयावरील सादरीकरण करून ही प्रभोधनात्मक भजनस्पर्धा पार पडली.
शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष माजी सभापती महादेव कोंढरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, बाळासाहेब गोडांबे, विलास अमराळे, घोटावडेचे उपसरपंच संतोष गोडांबे, जिल्हा कार्यध्यक्ष प्रशांत रानवडे, माजी सरपंच संतोष गोडांबे , बाजीराव धुमाळ, जनार्दन मातेरे, भीमाजी केसवड, सुनिल जाधव, माजी सरपंच बाळासाहेब केदारी, संदीप मांडेकर, शाम भेगडे, काळुराम भेगडे, दत्तात्रेय मालपोटे, अनिल मोरेउत्साहात व भक्तीमय वातावरणात , संतोष निम्हण तसेच तालुक्यातील वारकरी संप्रदायिक भाविकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेसाठी नियुक्त केलेले स्पर्धा प्रमुख पं. रघुनाथ खंडाळकर, समन्वयक विवेक थिटे, संदीप राक्षे, स्पर्धेचे मुळशी तालुका संयोजक बाबाजी शेळके व सोमनाथ साठे यांनी नियोजनबद्ध ही स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेचे परीक्षक तबला वादक रामदास भोयर व सुप्रसिध्द गायिका ज्योती गोराणे यांनी परीक्षण केले.
स्पर्धेतील बक्षीसपात्र संघ
प्रथम क्रमांक – संत सेवा भजनी मंडळ, भूकूम. द्वितीय क्रमांक श्री राम भजनी मंडळ कोळवली व श्री विठ्ठलराज रूक्मिणी भजनी मंडळ, आसदे. उत्तेजनार्थ – राजमाता महिला भजनी मंडळ चांदे, क्रांती महिला भजनी मंडळहिंजवडी,जोगेश्वरी महिला भजनी मंडळ माण, राम कृष्ण हरी महिला भजनी मंडळ धुमाळवाडी, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ बोतरवाडी व सावता महाराज भजनी मंडळ लवळे. यांना अनुक्रमे गौरविण्यात आले.