31जुलै रोजी, 106 टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये होणार रुजू
नवी दिल्ली – वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर भारताचा यष्टीरक्ष महेंद्रसिंग धोनीने पुढील दोन महिने लष्करी सेवेत घालवणार आहे. दरम्यान, आता धोनीची काश्मिरमध्ये नेमणूक झाली असून, 31जुलै रोजी धोनी 106 टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये (पॅरा) रुजू होणार आहे. आणि तो गस्त, गार्ड आणि पोस्ट ड्युटी करणार आहे. धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे.