सातारा : आज सातार्यात राष्ट्रवादी काॅंग्रेंस पक्षाने विधानसभेला इच्छुक असलेल्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी सातार्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुपस्थित होते.
त्याबद्दल अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, “शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुठेही गेले नाहीत ते राष्ट्रवादी पक्षासोबतच आहेत. त्यांनी अर्ज भरला नाही म्हणजे ते पक्षासोबत नाहीत, असा अर्थ काढू नका” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. शिवेंद्रसिंहराजेच काय, मी पण उमेदवारीसाठी अर्ज केलेला नाही. ही आमची चूक झाली ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.