Lok Sabha Election 2024 । मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेऊन राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. तसेच निवडणुकीत कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे, याची माहितीही दिली आहे.
लोकसभा निवडणुका 2024 मध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यात निवडणुका होणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
दरम्यान, सध्या सर्वपक्षींकडून उमेदवार चाचपणी सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 303 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
मात्र, कालांतराने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडल्याचं आपण पाहिलं. त्यामुळे शिवसेनेत उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन नवीन गट तयार झाले आहेत.
अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुद्धा पाहायला मिळाली. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन राष्ट्रवादी पक्षात आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत चित्र कसे असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातील खासदारांची यादी | महाराष्ट्रातील 48 खासदार (2019)
- नंदुरबार – हिना गावित भाजप
- धुळे – सुभाष भामरे भाजप
- जळगाव – उन्मेष पाटील भाजप
- रावेर – रक्षा खडसे भाजप
- बुलडाणा – प्रतापराव जाधव शिवसेना / शिंदे गट
- अकोला – संजय धोत्रे भाजप
- अमरावती – नवनीत कौर राणा राष्ट्रवादी
- वर्धा – रामदास तडस भाजप
- रामटेक – कृपाल तुमाणे शिवसेना शिंदे गट
- नागपूर – नितीन गडकरी भाजप
- भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे भाजप
- गडचिरोली-चिमूर – अशोक नेते भाजप
- चंद्रपूर – बाळू धानोरकर काँग्रेस / रिक्त
- यवतमाळ – वाशिम – भावना गवळी शिवसेना / शिंदे गट
- हिंगोली – हेमंत पाटील शिवसेना शिंदे गट
- नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर भाजप
- परभणी – संजय जाधव शिवसेना / ठाकरे गट
- जालना – रावसाहेब दानवे भाजप
- औरंगाबाद – इम्तियाज जलिल वंचित बहुजन
- दिंडोरी – डॉ. भारती पवार भाजप
- नाशिक – हेमंत गोडसे शिवसेना / शिंदे गट
- पालघर – राजेंद्र गावित शिवसेना / शिंदे गट
- भिवंडी – कपिल पाटील भाजप
- कल्याण – श्रीकांत शिंदे शिवसेना / शिंदे गट
- ठाणे – राजन विचारे शिवसेना / ठाकरे गट
- मुंबई-उत्तर – गोपाळ शेट्टी भाजप
- मुंबई – उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर शिवसेना / शिंदे गट
- मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) – मनोज कोटक भाजप
- मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन भाजप
- मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे शिवसेना / शिंदे गट
- दक्षिण मुंबई – अरविंद सावंत शिवसेना / ठाकरे गट
- रायगड – सुनिल तटकरे राष्ट्रवादी / अजित पवार गट
- मावळ – श्रीरंग बारणे शिवसेना / शिंदे गट
- पुणे – गिरीश बापट भाजप रिक्त
- बारामती – सुप्रिया सुळे राष्ट्रवादी / शरद पवार गट
- शिरुर – अमोल कोल्हे राष्ट्रवादी / शरद पवार गट
- अहमदनगर – सुजय विखे भाजप
- शिर्डी – सदाशिव लोखंडे शिवसेना / शिंदे गट
- बीड – डॉ. प्रीतम मुंडे भाजप
- उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर शिवसेना / ठाकरे गट
- लातूर – सुधाकरराव श्रंगारे भाजप
- सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी भाजप
- माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजप
- सांगली – संजयकाका पाटील भाजप
- सातारा – श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी / शरद पवार गट
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत शिवसेना / ठाकरे गट
- कोल्हापूर – संजय मंडलिक शिवसेना / शिंदे गट
- हातकणंगले – धैर्यशील माने शिवसेना / शिंदे गट
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
◾पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
2019 मध्ये कधी झाली होती निवडणुकांची घोषणा?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 10 मार्चला निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली होती. गेल्या वेळी 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या.
गेल्या वेळी 67.1 टक्के मतदान झाले होते. तर 23 मे रोजी मतमोजणी झाली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या.