मुंबई – अभिनेत्री मौनी रॉय तिच्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. निर्माती एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून ती प्रसिध्दीच्या झोतात आली. छोट्या पडद्यावरील उत्तम कामगिरीनंतर तिने बॉलीवूडमध्ये देखील मोठे यश मिळवले आहे. याशिवाय सोशल मीडियावरही ती तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे बीचवरील काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मौनीने फिकट आकाशी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटो मौनी खुपच हॉट दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोज देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस पडले आहे.
दरम्यान, मौनी रॉय शेवटची अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन’ या चित्रपटात दिसली होती. ती लवकरच ‘द व्हर्जिन ट्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. सिद्धांत कुमार सचदेव दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त, सनी सिंग आणि पलक तिवारी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
View this post on Instagram
अभिनय क्षेत्रातील या यशानंतर आता तिने उद्योग क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे. मुंबईमध्ये मौनी रॉय हिच्या मालकीच्या रेस्टॉरंटचे ओपनिंग झाले आहे. मुंबईच्या अंधेरी भागामध्ये मौनी रॉय हिने ‘बदमाश’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे.