देहूरोड, (वार्ताहर) – रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेली मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली. अमित अशोक खेर (वय 44, रा. शिवाजी विद्यालयासमोर, देहूरोड) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडे अकरा ते सोमवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांनी आपली १० लाख रुपये किमतीची मोटार शिवाजी विद्यालयासमोरील रस्त्यावर पार्क केली होती. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची मोटार चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे याबाबत अधिक तपास करीत आहेत.