न्यूयॉर्क – जगात सर्व काही आलबेल आहे असे वाटत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे जगभरातील विविध देशांमध्ये दहा लाखपेक्षा जास्त लोकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे आणि या वर्षी जर जागतिक स्तरावर प्रयत्न करण्यात आले नाहीत तर यापेक्षाही जास्त लोक उपासमारीमुळे प्रभावित होऊ शकतात असा इशारा संयुक्त राष्ट्र संघानेच दिला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये करोना महामारी व त्यानंतर विविध देशांत देशांमध्ये सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती याचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक देशातील लोकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे गंभीर स्थिती असलेल्या देशांमध्ये अफगाणिस्थान सुदान इथिओपिया येमेन सोमालिया या गरीब देशांचा समावेश आहे संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी संघटना या संस्थेने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे अनेक देशांमध्ये दुष्काळाच्या परिस्थितीमुळे अन्नाची टंचाई वाढत चालली आहे.
त्याचा परिणाम उपासमारीवर होऊ लागला आहे केवळ आफ्रिकेतील देशातच नव्हे तर ज्या देशांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे तेथेही धान्य टंचाई निर्माण झाल्याने उपासमारीचा धोका वाढू लागला आहे आगामी कालावधीमध्ये जगात अनेक ठिकाणी अन्नाची टंचाई होण्याचा धोकाही या अहवालात वर्तवण्यात आला आहे अनेक देशांमध्ये गेल्या दीड वर्षाचा कालावधीमध्ये अन्नधान्याच्या वस्तूंची महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने त्याचाही फटका बसला आहे.
सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटकाही जगाला बसला आहे रशिया आणि युक्रेन हे जगातील सर्वात मोठे धान्याचे निर्यातदार देश आहेत युद्धपरिस्थितीमुळे या देशातून होणारी धान्याची निर्यात कमी झाल्याने त्याचा फटका जागतिक अन्नपुरवठ्याला बसला आहे जागतिक स्तरावर सर्व प्रमुख देशांनी युनोच्या पुढाकाराने जर याबाबत काही उपाययोजना केली नाही तर या वर्षी ही परिस्थिती अधिकच गंभीर बनू शकते असा इशाराही देण्यात आला आहे.