पुणे :- स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसऱ्या “स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत कल्याण इलेव्हन संघाने सलग पाचवा तर, टायटन बुल्स् संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून चौथ्या विजयासह आगेकूच केली.
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ऋत्विक महाजन याच्या 73 धावांच्या खेळीमुळे कल्याण इलेव्हन संघाने युनायटेड थंडरझ्चा 55 धावांनी पराभव करत सलग पाचवा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कल्याण इलेव्हनने 219 धावांचा डोंगर उभा केला. ऋत्विक महाजन याने 73 धावांची खेळी केली. आकाश शहा (38 धावा), जितेंद्र राऊत (31 धावा) आणि कुणाल शहा (25 धावा) यांनी धावांचे योगदान दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना युनायटेड थंडरझ् संघाचा डाव 164 धावांवर मर्यादित राहीला. संतोषकुमार सांगळे याच्या फलंदाजीच्या जोरावर टायटन बुल्स् संघाने लिजंड्स स्पोर्टस क्लबचा 2 गडी राखून पराभव करत चौथा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लिजंड्स स्पोर्टस क्लबने 225 धावांचे आव्हान उभे केले. अभिषेक बोधे याने 70 धावांची खेळी केली. यासह गणेश जोशी याने 63 धावांचे योगदान दिले. टायटन बुल्स् संघाने 18.3 षटकात हे आव्हान गाठले. संतोषकुमार सांगळे याने 38 चेंडूत 13 चौकारांसह 68 धावा फटकावल्या. सुनिल यादव (नाबाद 45 धावा) आणि गिगी खोखर (37 धावा) यांनी योग्य साथ देत संघाचा विजय सोपा केला.
शराफत अली शहा याच्या तुफानी खेळीमुळे युनायटेड थंडरझ् संघाने सेकंड इनिंग क्लबचा 4 गडी राखून पराभव करत दुसरा विजय नोंदविला. सेकंड इनिंग क्लबने प्रथम फलंदाजी करताना 203 धावांचे आव्हान उभे केले. मंदार सुर्वे याने 58 धावांची खेळी केली. युनायटेड थंडरझ्ने हे आव्हान 16.5 षटकात व 6 गडी गमावून पूर्ण केले. शराफत अली शहा याने फक्त 19 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने नाबाद 73 धावा चोपून काढल्या. सिद्धार्थ रोमन याने सुद्धा 64 धावांची खेळी करून योग्य साथ देत संघाचा विजय साकार केला.
सामन्याचा संक्षिप्त निकाल :-(गटसाखळी फेरी)
सेकंड इनिंग क्लबः 20 षटकात 5 गडी बाद 203 धावा (मंदार सुर्वे 58 (29, 8 चौकार, 3 षटकार), कुणाल फणसे 36, अमोल ठोंबरे 25, आदित्य कर्जतकर 2-29) पराभूत वि. युनायटेड थंडरझः 16.5 षटकात 6 गडी बाद 204 धावा (शराफत अली शहा नाबाद 73 (19, 4 चौकार, 9 षटकार), सिद्धार्थ रोमन 64 (44, 10 चौकार, 1 षटकार), दिनेश नायडू 2-25); सामनावीरः शराफत अली शहा;
लिजंड्स स्पोर्टस क्लबः 20 षटकात 6 गडी बाद 225 धावा (अभिषेक बोधे 70 (37, 11 चौकार, 1 षटकार), गणेश जोशी 63 (35, 3 चौकार, 5 षटकार), विपुल खैरे 30, अमित भारव्दाज 3-51) पराभूत वि. टायटन बुल्सः 18.3 षटकात 8 गडी बाद 226 धावा (संतोषकुमार सांगळे 68 (38, 13 चौकार), सुनिल यादव नाबाद 45, गिगी खोखर 37, विपुल खैरे 3-35, सुयश भट 2-39); सामनावीरः संतोषकुमार सांगळे;
कल्याण इलेव्हनः 20 षटकात 9 गडी बाद 219 धावा (ऋत्विक महाजन 73 (31, 6 चौकार, 5 षटकार), आकाश शहा 38, जितेंद्र राऊत 31, कुणाल शहा 25, शराफत शहा 3-35, सिद्धार्थ रोमन 3-33) वि.वि. युनायटेड थंडरझः 20 षटकात 7 गडी बाद 164 धावा (सिद्धार्थ रोमन 38, फैझ शेख 31, रोहीत गुगळे 2-21, अमत खेडेकर 2-34); सामनावीरः ऋत्विक महाजन.