मोदींनी उडवली काँग्रेसची खिल्ली ; संयुक्त राष्ट्राने तुम्हाला विचारायला हवं होतं…

राजस्थान: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी, काँग्रेस स्वत:ची खिल्ली उडवून घेत आहे. काँग्रेस विचारणा करत आहे की निवडणुकीच्या वेळीच हा निर्णय का घेण्यात आला. हा काय मोदींच्या कॅबिनेटने निर्णय घेतला आहे का ? असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला.

‘आधी संयुक्त राष्ट्राने काँग्रेसला विचारायला हवं होतं की, मॅडमजी तुम्ही ज्यांना साहेब म्हणून बोलवता त्यांना आम्ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करु का ? तुम्हाला काही समस्या तर नाही ना’, काँग्रेसची अशी खिल्लीही मोदींनी उडवली.

‘दोन दिवसांपूर्वी भारताचा मोठा शत्रू मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं. पाकिस्तानात बसलेला हा दहशतवादी भारताला एकामागून एक जखमा देत होता. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या मंसुब्यांवर ही तिसरी मोठी स्ट्राइक आहे’,ते मोदी म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.