उन्हाळ्यात कोमल त्वचेची निगा

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. बाहेर पडताना पाण्याची बाटली आवर्जून जवळ ठेवा. बाहेर पडताना शरीर, विशेष करून चेहरा, डोके झाकून घ्या. त्वचेची निगा राखण्यासाठी-

कडक उन्हामुळे तुमच्या त्वचेचा रंग सावळा झाला असेल, तर कच्चा टोमॅटो कुस्करून त्यात ताक मिसळून चेहऱ्याला लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो.

काळवंडलेल्या भागाला दही लावून 10 मिनिटे थांबा. मग स्वच्छ पाण्याने धुवा. काळपटपणा कमी होतो.

काकडीचा रस, अर्धा चमचा ग्लिसरीन व 1 चमचा गुलाब पाणी घेऊन त्वचेवर लावल्याने त्वचा नरम पडते.

एक चमचा लोणी आणि एक चमचा पाणी एकत्र करून फेटून घ्या. उन्हामुळे रापलेल्या त्वचेला आराम पडेल.

आठवड्यातून एकदा वस्त्रगाळ चंदन पावडर-2 चमचे, गुलाबपाणी 3 चमचे आणि चमचाभर मुलताणी मिट्टी यांचे मिश्रण करून त्याने घरच्या घरी फेशियल करावे. मसाज हलक्‍या हाताने गोलाकार करावा. यामुळे त्वचेचा पोत सुधारून चेहरा फ्रेश दिसतो.

कोल्ड्रिंक पिणे टाळा त्यात CO2 चे प्रमाण जास्त असल्याने जठराग्नी मंदावतो व पाचनक्रिया मंदावते. शीतपेयात साखरेचे प्रमाणही जास्त असते. त्याचा एकूणच शरीरसंस्थेवर विपरित परिणाम होतो.

सनस्क्रीन लोशन चांगल्या दर्जाचे वापरा (SPFपेक्षा अधिक असावा) कॉस्मेटिकपेक्षा मेडिकल सनस्क्रीन जास्त उपयुक्त असतात.

उन्हाळ्यात एक बादली कोमट पाण्यात दोन थेंब लिंबूरस टाकून आंघोळ करावी. त्यामुळे त्वचा उजळते.

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी सकाळी उपाशीपोटी ग्लासभर गाजराचा रस प्यावा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.