कोटी मोलाचे मोदी

पंतप्रधानांची प्रतिमाही खातेय भाव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र यांच्या उभे छायाचित्र असणाऱ्या गौरवचिन्ह तब्बल एक कोटी रूपयांना विकले गेले. विशेष म्हणजे या गौरवचिन्हावर पंतप्रधानांचा गुजरातीत दिलेला संदेश आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ते मोदी यांना भेट दिले होते. इ लिलावात त्याची अपेक्षित किंमत 18 हजार रुपये होती.

मोदी यांना मिळालेल्या गाय वासराची धातू प्रतिकृतीनेही चांगलाच भाव खाल्ला. त्याला 51 लाखांची बोली लागली. याची अपेक्षित किंमत दीड हजार रुपये होती. हा लिलाव 14 सप्टेंबरला सुरू झाला असून तीन ऑक्‍टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. यात मोदी यांना भेट मिळालेल्या 2 हजार 772 वस्तूंचा समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here