देहूगाव, दि.1 (वार्ताहर) – येथील धर्मवीर संभाजी चौकामध्ये जगदंबा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंडळांचे हे 25 वे वर्ष असुन, यंदा नयनरम्य विद्युत रोषणाईने सजावट केलेले 60 फूट उंच व 40 फूट रुंदीचे कोलकाता येथील काली माता मंदिराचा प्रतिकृती देखावा नागरिकांना आकर्षित करीत आहे.
न्यू होम मिनिस्टर, रास दांडिया, गरबा स्पर्धा, खेळ रंगला पैठणीचा, होम मिनिस्टर नवे पर्व, डान्स, मनोरंजक, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाने उत्सव साजरा होत आहे. स्पर्धेतील विजेत्या महिलांना मानाची पैठणी साडी, फ्रीज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, मिक्सर तर सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहे.
आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, रूपाली चाकणकर, नितिन शिंदे, सभापती, नगरसेवक,विविध राजकीय,सामाजिक पदाधिकारी यांनी मंडळाला भेटी दिल्या.
निमंत्रक नगरसेविका पौर्णिमा परदेशी, विशाल परदेशी, प्रकाश हगवणे मंडळाचे आधारस्तंभ आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, कार्याध्यक्ष उमेश साळुंखे,उपाध्यक्ष गणेश परदेशी,शुभम शिंगाडे, सल्लागार सोमनाथ चव्हाण, नीलेश मोरे, शैलेश चव्हाण, विजय मुसुडगे, नंदराज पांडे, पांडुरंग जाधव, आकाश साळुंके, चंद्रकांत भोसले, रमेश पांडे, मच्छिंद्र चव्हाण, शामकांत हिंगे, दिल दोस्ती मित्र परिवार, समर्थ मित्र मंडळाचे पदाधिकारी उत्सवासाठी परिश्रम घेत आहेत.
दोन ठिकाणी स्वच्छता मोहिमेसह इतर उपक्रम
या लीगसाठी कॅप्टन म्हणून लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तलाव ते राजमाची उद्यान आणि सहारा पूल ते भुशी धरण या दोन ठिकाणी स्वच्छता अभियानासोबतच पथनाट्य, प्लोग अ थोनसह इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यापूर्वीदेखील लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य केले आहे. नगरपरिषदेच्या या कार्याचे विविध स्तरांतुन कौतुक होत आहे.