Mithun Chakraborty: अभिनेता मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी त्यांच्या अभिनयातून सिनेसृष्टीत स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली आहे. आजही त्यांचे चित्रपट आवडीने पाहायले जातात. आजही त्यांच्या कामातील उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. मात्र आता मिथून चक्रवर्ती डेडपूल 3 या प्रसिद्ध चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. मिथून चक्रवर्ती यांचा एक फोटो व्हायरल होत असल्याने ही चर्चा सध्या सुरू झाली आहे.
डेडपूलच्या पहिल्या आणि दुसऱ्यानंतर आता त्याचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातच आता डेडपूल 3 मध्ये मिथून चक्रवर्ती दिसणार असल्याने चाहतेही आनंदी झाले आहेत. व्हायरल फोटोमध्ये रेन, ह्युग जॅकमॅन यांच्यासोबत डिस्को डान्सर मिथून चक्रवर्ती दिसत आहेत. त्या फोटोनं नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना कोड्यात टाकले आहे. काहींनी तो फोटो पाहून मिथून डेडपूल 3 मध्ये दिसणार की काय, असे प्रश्न विचारले आहेत.
Indian Deadpool dushmano ko chata de dhool…😂😂 #Deadpool #Bollywood pic.twitter.com/DURgZMfoP9
— Paarth (@paarth_23) March 29, 2017
मात्र प्रत्यक्षात हा फोटो हा फेक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोटो एडिट करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तो फोटो मिथुन यांच्या एका चित्रपटातील असून डेडपूल 3 च्या टीमसोबत एडिट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये मिथूनजी हे खूपच तरुण असल्याचे दिसून येते. सध्या मिथूनची यांचे वय 73 असून त्या फोटोमध्ये तर त्यांचे वय हे चाळीशीच्या आत दिसून येते. त्यामुळे डेडपूल 3 मध्ये मिथून चक्रवर्ती दिसणार असल्याची ही अफवा असल्याचे दिसत आहे.