मुंबई – प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या आई इंदिराबाई कडु यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. यासंदर्भात बच्चू कडु यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. इंदिराबाई यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई इंदिराबाई बाबाराव कडु यांचे 84 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी (13 मार्च) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बेलोरा ता. चांदुर, अमरावती येथे सकाळी 10 वाजता अंत्यविधी होईल, अशी माहितीही बच्चु कडु यांनी दिली आहे.