श्री गुरु तेगबहादूर यांच्या 400 व्या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी बैठक

नवी दिल्ली – श्री गुरू तेग बहादुर जी यांचा 400 वा जन्मशताब्दीसोहळा अर्थात प्रकाश पर्वानिमित्त विचारविनिमयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. श्री गुरू तेग बहादुर यांचा 400 व्या प्रकाश पर्वचे संस्मरण हे धार्मिकच नव्हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे असे पंत्तप्रधानांनी सांगितले.

शीख गुरुपरंपरा ही पूर्ण जीवनाचे तत्वज्ञान आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. गुरू नानक देव जी यांचा साडेपाचशेवा प्रकाश पर्व, गुरू तेगबहादूरजी यांचा चारशेवा प्रकाश पर्व आणि श्री गुरू गोविंद सिंगजी यांचा साडेतीनशेवा प्रकाश पर्व साजरा करण्याचे भाग्य आपल्या सरकारला लाभले याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गुरू तेग बहादुर जी यांच्या 400 व्या प्रकाश पूरब संस्मरणाशी जास्तीत जास्त लोक जोडले जावेत म्हणून वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. 

श्री गुरू तेग बहादुर जी यांचे जीवन आणि शिकवणच नव्हे तर संपूर्ण गुरु परंपरा जगभरात नेण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमांचे आयोजन केले जावे. जगभरातील गुरुद्वारा आणि शीख समुदायाकडून केल्या जात असलेल्या सामाजिक सेवांचा गौरव करत शीख परंपरेच्या या पैलूचे व्यवस्थित संशोधन आणि नोंदी केल्या जाव्यात, असे पंतप्रधान म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.