पुणे,दि.13- भारती विदयापीठ हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरांचे रुममध्ये छुपे कॅमेरे लावणाया प्रतिष्ठीत डॉक्टर आरोपीस भारती विदयापीठ पोलीसांनी अटक केली आहे. त्याने ऍमेझॉनवरुन छुपा कॅमेरा असलेला बल्प खरेदी केला होता. त्याला प्रशिक्षण घेणारी महिला डॉक्टर आवडत होती. तिला नग्न पहाण्याची इच्छा होती. यामुळे त्याने कॅमेरा लावला होता .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सहा जूलै रोजी भारती विदयापीठ कॅम्पस (धनकवडी) या ठिकाणातील महिला डॉक्टरांचे राहते रुममध्ये कोणीतरी बनावट चावीच्या सहाय्याने लॉक उघडून व आतमध्ये प्रवेश केला होता. यानंतर बेडरुम व बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावला होता. हा प्रकार संबंधीत डॉक्टर महिलेच्या लक्षात आल्यावर तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तपास पथकाचे अधिकारी नितीन शिंदे व त्यांचा पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारेआरोपीचा शोध घेत असताना डॉ. सुजित जगताप यांचेवर संशय आला. त्यांला ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता त्याने सदरचा छूपा कॅमेरा लावल्याचे कबुल केले.गुन्हयाचा अधिक तपास चालु असून त्यांची दोन दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे.
ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, जगदिश खेडकर, सचिन पवार, सर्फराज देशमुख, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, योगेश सुळ, सचिन गाडे, निलेश खोमणे, समिर बगशिराज, शिवदत्त गायकवाड, प्रविण सपकाळ, गणेश सुतार,तुळशीराम टेभुर्णे, प्रसाद टापरे व संतोष खताळ यांनी केली आहे.