मुंबई – केंद्रीयमंत्री मंडळाच्या विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर पंकजा यांचा दिल्ली दौऱा झाला. या दौऱ्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मला कुणालाही पदावरून खाली खेचून माझी शक्ती वाया घालवायची नाही. माझी शक्ती या छोट्याशा मंडपात पुरणार नाही, असं म्हणत शक्ती दाखवायची असती तर त्यासाठी ही जागा पुरणार नाही, असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतल्याचं सांगितलं. तसेच राज्यात पंतप्रधानांनी मला झापल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. माझ्या चेहऱ्यावरून बोलण्यावरून मला फटकारलं असेल असं वाटतं का? असा सवाल करतानाच पंतप्रधानांनी सन्मानजनक वागणूक दिल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे आपल्या नेत्याचं काय होणार ही कार्यकर्त्यांना चिंता होती. त्यांच्या मनात द्वंद होतं. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्यासाठी हे धर्मयुद्धच आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं मला या धर्मुयद्धात पडायचं नाही, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.