मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. एखाद्या चाहत्यांची कमेंट किंवा मिम तिला आवडले तर ती लगेच त्यावर रिप्ले देखील देते. नुकतंच प्राजक्ताने आपल्या भावाच्या लग्नातील लूक इंस्टावर शेअर केला. प्राजक्ताचा हा साडीतील लूक पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.
हिरवी साडी,नाकात रुबाबदार नथ आणि माथ्यावर चंद्रकोर अशा थाटात प्राजक्ताने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिचा हा जबरदस्त अंदाज पाहून चाहत्यांना मात्र राहवलं नाही अनेकांनी तिला कमेंटमध्ये तिचे लोकेशन देखील विचारले आहे. ‘भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं. साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे. दागिने थेट कोल्हापूरातून आणलेत. तेव्हा कुठे जाऊन लूक साधला गेला आणि आत्मा सुखावला.’ असं लिहीत प्राजक्ताने पोस्ट केलेले फोटो चांगलेच व्हायरल होताहेत.
एका चाहत्याने तर या फोटोवर कमेंट करत करू की नको लग्न मी सांग ? असा सवाल प्राजक्ताला विचारला आहे. त्यावर प्राजक्ताने देखील त्याला भन्नाट रिप्ले दिला आहे. प्राजक्ता म्हणते,करून टाक माझा काही भरोसा नाही”.