पुणे (प्रभात वृत्तसेवा) – कंपनीत एकत्र काम करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एक वर्षाहून अधिक काळ तिच्यावर बलात्कार करणाऱ्याला सत्र न्यायाधीश एम.एम. देशपांडे यांनी जामीन मंजूर केला. प्रवीण विठ्ठल कणाके (वय 27, रा. आंबेगाव खुर्द, मूळ. ओडकी, ता. राजेगाव, जि. यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
याबाबत पीडित 25 वर्षीय तरुणीने चतु:शृगी पोलिसात फिर्याद दिली आहे. डिसेंबर 2017 ते जानेवारी 2019 या कालावधीत ही घटना घडली. प्रवीण आणि पीडित एका कंपनीत कामाला होते. त्याने लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध निर्माण केले. नंतर लग्नास नकार दिला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयीन कोठडीत असताना त्याने ऍड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. पुराव्यात ढवळाढवळ कयायची नाही, सुनावणीस नियमित हजार राहण्याचा आणि अन्य काही अटींवर न्यायालयाने वरील आदेश दिला.