मुंबई – मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नुकतंच (गुरुवारी) 68 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी आलिया भट्ट, अनिल कपूर, रेखा, जान्हवी कपूर, नोरा फतेही, विकी कौशल आणि इतर कलाकारांनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. यंदाचा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार “राजकुमार राव’ला मिळाला, तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळाला.
दरम्यान, यावेळी आपल्या दिलखेच अदा आणि बोल्ड स्टाईलने सर्वांना घायाळ करणारी मराठमोळी अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ने देखील विशेष हजेरी लावली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी सई ताम्हणकरनं अतिशय ग्लॅमरस असा लूक केला होता. या यावेळी काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये किलर पोझ देताना सई ताम्हणकर दिसली. सध्या सगळीकडे अभिनेत्रीचे हे फोटो व्हायरल होत असून, फॅन्सकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियावर सईचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान, तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे सुद्धा सई तिच्या चाहत्यांना सांगत असते.