मुंबई : मराठी चित्रपत्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे रमेश देव यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त समोर आहे. त्याचे पूत्र अजिंक्य देव यांनी माध्यमांशी बोलताना रमेश देव यांच्या निधनाचं वृत्त दिलं.
मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी 93 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. तीन दिवसांपूर्वीच रमेश देव यांचा ९३वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
“आनंद” आणि “ताकदीर” या चित्रपटातील अविस्मरणीय भूमिकेसाठी ते ओळखले जातात. देव यांनी ‘अंधाळा मगतो एक डोळा’ (१९५६) या चित्रपटातून करमणूक उद्योगात पदार्पण केले. त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट “आरती” होता.
रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ कोल्हापुरमध्ये झाला होता. रमेश देव यांनी अलिकडच्या काळातील “जॉली एलएलबी” ‘घायल वन्स अगेन’ चित्रपटात काम केले होते. त्यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना लाइफ टाईम अवॉर्डिअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.