मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठमोळी अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं.
विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे सुद्धा सई तिच्या चाहत्यांना सांगत असते.
View this post on Instagram
सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजही काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो समोर येताच तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे. परंतु असेही काही लोक आहेत, ज्यांना सईचा हा अंदाज फारसा रुचलेला दिसत नाहीय.
काही नेटकऱ्यांनी सईच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी ट्रोल केलं आहे. एकाने ट्रोल करत लिहिलंय, ‘तुमसे ना हो पायेगा’. तर दुसऱ्याने लिहिलंय, ‘काहीही’, तर आणखी एकाने लिहिलंय, ‘या कोणत्या पोज आहेत’. तर चौथ्याने लिहिलंय, ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’.