Maratha Reservation : चलो मुंबई असं म्हणत २० जानेवारी मुंबईला आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जराजे यांनी जाहीर केलं. आझाद मैदानावर २० जानेवारीला आमरण उपोषण करणार सर्व मराठा समाजाने साथ द्या असं जरांगे यांनी जाहीर बीड येथील सभेतून जाहीर केलं. जरांगेच्या या निर्याणावर आता मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका मांडताहेत. जरांगे यांनी २४ डिसेंबर ही अंतिम तारीख यापूर्वी सरकारला दिली होती. त्यानंतर आता जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षनाबाबतची क्युरेटिव्ह पिटिशन मान्य केल्याची आठवण करून दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,”सुप्रीम कोर्ट २४ जानेवारीला पिटिशन ऐकणार आहे.कोर्टाने महाराष्ट्रातील जनतेचा आदर राखून पिटेशन ऐकण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी कोर्टाचे मनापासून आभार मानतो असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी सरकारचे वकील २४ जानेवारीला आपला मुद्दा मांडतील.यावेळी फुल प्रूफ बाजू सरकारचे वकील बाजू मांडतील. तोपर्यंत शांतता सुव्यवस्था राखली पाहिजे. आपण कोर्टाचा आदर राखू तोपर्यंत सर्वांनी सय्यम राखावा कोर्टात आता मॅटर सुरु होईल तोपर्यंत जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची सर्वानीच काळजी घेतली पाहिजे असं शिंदे म्हणाले.
मराठा समाजाच्या दृष्टीने कोर्टाची बाजू ओपन झाली आहे तोपर्यंत कोणीही कोणतीही घाई गडबड करू नये असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
२० जानेवारीला आमरण उपोषण
सरकारला तीन चार वेळा वेळ वाढवून दिला. तारखा देखील बदलल्या. आता आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायची का ? तारीख ठरवायची का ? पुन्हा एकदा विचारतोय असं म्हणत बीडच्या सभेतच मनोज जरांगेनी कौल घेतला त्यावेळी सभेतून हो म्हणून उत्तर आलं. त्यावर चलो मुंबई असं म्हणत २० जानेवारी मुंबईला आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जराजे यांनी जाहीर केलं. आझाद मैदानावर २० जानेवारीला आमरण उपोषण करणार सर्व मराठा समाजाने साथ द्या असं जरांगे यांनी जाहीर केलं.