manoj jarange patil । मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करा, असा आदेश न्यायालयाने दिला.
दरम्यान, त्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून मराठा समाजातून सरकारप्रती नाराजी व्यक्त केली जात आहे. सगे-सोयरे यांच्याविषयीचा जो अध्यादेश राज्य सरकारने आणला आहे त्याचे रुपांतर कायद्यात करा, अशी प्रमुख मागणी करत मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत.
जालना जिल्ह्यातील आंरवाली सराटी या गावात जरांगे यांचे उपोषण चालू आहे. त्यांच्या उपोषणस्थळी मराठा समाजाचे शेकडो आंदोलक जमा झाले आहेत. त्यांचा उपोषणाचा सातवा दिवस आहे. । manoj jarange patil
दरम्यान, मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यामुळे राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलकांनी भाजपचे आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख व काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन आक्रोश केला.
तसेच ठिय्या मारत लोकप्रतिनिधींना जाब विचारला. छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री येथील तहसील कार्यालसमोर मराठा समाजाच्या तरुणांनी अर्धनग्न आंदोलन केले.तसेच छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले. तसेच बीड, सोलापूरसह अनेक जिल्हयांमध्ये मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम करण्यात आला. । manoj jarange patil