Manoj Jarange Patil on Ajay Baraskar । मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकरयांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली.
अजय महाराज बारसकर यांनी मोठे खुलासे करत जरांगेंवर टीकास्त्र डागले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा कुटुंबांना उध्वस्त केले आहे, अशी घणाघाती टीका अजय महाराज बारसकर यांनी केली. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. । Manoj Jarange Patil on Ajay Baraskar
यावेळी बोलताना अजय महाराज बारसकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात किती अन् कुठं गुप्त बैठका झाल्या या संदर्भातील संपूर्ण माहिती उघड केली आहे. दरम्यान, आता अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेला मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, “माझ्यावर असेस आरोप रॅलीच्या आधीच होणार होते पण तो ट्रॅप फसला. अजय बारसकर हा बांधावरून उठला आणि महाराज झाला. तो भोंदू महाराज असून याच्या मागे कोणते नेते आणि मंत्री हे मला माहिती आहे.
मी मराठा समाजासाठी कट्टर, बारसकर हा हेकेखोर आहे. सरकारने हे असे ट्रॅप लावणं बंद करावं नाहीतर याच्यापेक्षा आणखी जड जाईल. प्रत्येकाला सांगितलं होतं की ज्याला मध्यस्थी करायची त्याने स्वत:चा स्वार्थ पाहू नका.
सरकारचा हा ट्रॅप असून मला बाजूला करण्यासाठी हे सर्व एकत्र माझ्याविरोधात भिडवणार आहेत. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला.
मनोज जरांगेंच्या विश्वासू जोडीदाराने केले मोठे खुलासे…. । Manoj Jarange Patil on Ajay Baraskar
मी साक्षी आहे. रांजनगाव गणपती इथं उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मिटिंग केली आहे. लोणावळा, वाशीमध्ये ही समाजाला वगळून मिटिंग केली. वाशी आंदोलन इथवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो.
मात्र त्यांचा मिटिंगमुळे मला आक्षेप होता.’ तर पहिली गुप्त मिटींग बीडला कन्हैया हॉटेलमध्ये झाली. त्याची माहिती उपलब्ध आहे. दुसरी गुप्त मिटींग रांजणगावला पहाटे 4 वाजता झाली.
तिसरी गुप्त मिटींग पुण्यातील औंध परिसरात झाली. त्यानंतर लोणावळ्याला झाली. पाचवी मिटींग वाशी येथे समाजाला वगळून केली. वाशी पर्यंत मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या बैठकांवर आक्षेप होता. असं अजय महाराज बारसकर म्हणाले. । Manoj Jarange Patil on Ajay Baraskar